'आ.. देखे जरा किसमें कितना है दम', नगर तालुक्यात घमासान...बुऱ्हाणनगरातही निवडणूक‌ !

 

'आ.. देखे जरा किसमें कितना है दम', नगर तालुक्यात घमासान...

 फक्त वारूळवाडी,  दशमीगव्हाण,अकोळनेर बिनविरोध
नगर : नगर तालुक्यात 'बिनविरोधच्या आवाहन झुगारले असून बहूतेक गावात घमासान होणारच, हे आज अर्ज माघारी नंतर स्पष्ट झाले आहे.तालुक्यात ५९ ग्रामपंचायतीपैकी केवळ वारूळवाडी, अकोळनेर, दशमी गव्हाण या ३ ग्रामपंचायतच बिनविरोध झाल्या . आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ३o वर्षानंतर निवडणुक होत आहे .वारूळवाडीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले तर अकोळनेरची निवडणूक बिनविरोध करण्यात आमदार निलेश लंके यशस्वी ठरले . तालुक्यातील तांदळी वडगाव , आंबिलवाडी, घोसपुरी , शिराढोण या गावात बिनविरोध निवडणुकीचा निर्णय झाला होता . मात्र ऐनवेळी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने या गावातील बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.  . माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर गावातही ३० वर्ष निवडणुका बिनविरोध झाल्या . त्यात मागील निवडणुकीपासुन खंड पडला . यावेळीही बुऱ्हाणनगर गावात बिनविरोध निवडीची परंपरा खंडीत झाली . 
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post