मोठी बातमी... 'या' राज्यात कॉंग्रेसचे ११ आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत

बिहारमध्ये कॉंग्रेसला बसणार झटका? ११ आमदार पक्ष सोडण्याची शक्यता पाटणा :  बिहार विधानसभा निवडणुकीत अपयश पदरी पडल्यानंतर आता कॉंग्रेसला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.बिहारमधले काँग्रेसचे  19 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.काँग्रेस पक्षाचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. 19 पैकी 11 आमदार काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता माजी आमदार भरत सिंह यांनी वर्तवली आहे. काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार असे आहेत ज्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली असली तरी ते काँग्रेसचे नाहीत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट घेतलं आणि आमदार झाले”, असा गौप्यस्फोट भरत सिंह यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post