'केबीसी'मधून बिग बी घेणार exit !

 'केबीसी'मधून बिग बी घेणार exit ! सोशल मीडियावरील पोस्ट मुळे चर्चामुंबई : कौन बनेगा करोडपती व अमिताभ बच्चन हे समीकरण अनेक वर्षांपासून हिट ठरलेले आहे. मात्र आता बिग बी अमिताभ बच्चन  केबीसी शोमधून रिटायरमेंट घेत असल्याचे  संकेत दिलेत. नुकताच अमिताभ यांनी केबीसीचा अखेरचा एपिसोड शूट केला. आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.माफ करा, मी थकलोय आणि आता रिटायर झालोय. मी तुमच्या सर्वांची माफी मागतोय, कौन बनेगा करोडपतीच्या चित्रिकरणाचा अखेरचा दिवस खूपच लांबला. कदाचित उद्या पुन्हा करेन. मात्र  हे लक्षात ठेवा की काम तर काम असतं आणि ते तन्मयतेने करायला हवं. शुटींगच्या शेवटच्या दिवशी फेअरवेलच्या निमित्ताने खूप सारं प्रेम मिळालं. शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. इच्छा हिच आहे की, कधीच थांबायचे नाही, सतत चालत रहायचे.आशा आहे की हे सगळं पुन्हा होईल. सेटवर सगळ्यांनी कायमच माझी काळजी घेतली. अनेक महिन्यांपासून सगळे जण एकत्र होतो. ते क्षण कायम आठवणीत राहतील. केबीसी शोच्या क्रू मेंबर आणि सर्व टीमचे आभार.'

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post