भारताला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे

भारताला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे

संभाजीराव भिडे गुरुजी यांचं राष्ट्रीय मतसांगली : प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू व सूर्यप्रकाशाची जशी गरज आहे, तशीच या देशाला हिंदूस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनेची गरज आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे काम आपण वाढवूया. एका चौकाचे नामकरण करुन उपयोग नाही. संपूर्ण देशात शिवसेनेचे व बाळासाहेबांचे नाव झाले पाहिजे.संपूर्ण देशात शिवसेना उभी करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण् करण्याची धडपड आपण केली पाहिजे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले. हे राजकीय मत नसून राष्ट्रीय मत असल्याचा उल्लेखही भिडे यांनी केला.

सांगली येथील स्टेशन चौकास बाळासाहेब ठाकरे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम व जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संभाजीराव भिडे उपस्थित होते. ते म्हणाले, सांगलीत शिवसेनेच्या २०० ते २५० शाखा का नाहीत. शाखा वाढल्या पाहिजेत. लोकसेवा तत्पर ठेवून शिवसेनेचा प्रवाह अखंडित ठेवायला हवा.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post