आ.रोहीत पवार अंडा भुर्जी बनवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा... Video.

आ.रोहीत पवार अंडा भुर्जी बनवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा....नगर (सचिन कलमदाणे):  राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार सर्वसामान्यांमध्ये नेहमीच रमतात. मुंबई दौर्यात विविध स्तरांतील लोकांना भेटत असताना पोटपूजा करण्यासाठी ते साध्यासुध्या अंडा भुर्जीच्या गाडीवर पोहचले. याठिकाणी गाडीवाल्याचे कौशल्य पाहून आ.पवार यांनाही अंडा भुर्जी स्वतः करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी तडका देण्याचा प्रयत्नही केला. या अनुभव त्यांनी ट्वटिटरवर शेअर केलाय. 

आ.पवार यांनी म्हटले आहे की,

नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post