जिल्हा नियोजनचा अखर्चित निधी जिल्हा परिषद, नगरपालिकांना मिळणार

 शेतकरी जगला तरच देश जगेल: उपमुख्यमंत्री अजित दादा पवार.

जिल्हा नियोजनचा अखर्चित निधी जिल्हा परिषद, नगरपालिकांना मिळणारप्रतिनिधी/श्रीगोंदा :  केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा रद्द करावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांची मागणी योग्य असून शेतकरी आपल्या शेतात काबाडकष्ट करून पिकविलेल्या पिकांना योग्य बाजारभाव मागत आहे. आमची पिळवणूक,लुबाडणूक  नको फक्त आम्हाला न्याय द्या. परंतु तिथेही केंद्र सरकारने मार्ग काढण्याऐवजी हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. शेतकरी जगला तरच देश जगेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले.

            श्रीगोंदा नगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा व नवीन कामांचे भूमिपूजन ना.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आमचे सहकारी मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे लागणाऱ्या विकासकामांना कुठेही निधी कमी पडू देणार नाहीत. पुढे ते म्हणाले की जगासह अख्खा देश व राज्याला कोरोना महामारीने थैमान घातल्याने शेती, उद्योगधंदे अडचणीत आल्याने राज्याचा विकास दर घसरला. केंद्राचा पैसा, कर्ज व राज्य सरकारच्या उत्पन्नात १ लाख कोटी रुपयांचा घसारा झाल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे तर राज्याला पेन्शन आणि पगारापोटी १२ हजार कोटी रुपये महिन्याला खर्च असून केंद्र सरकार मागूनही २५ हजार कोटी रुपये देत नाहीत. परंतु महाविकास आघाडीचे राज्य सरकार आर्थिक संकट असूनही कुठल्याही विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. नगर जिल्ह्याचा कोट्यवधी रुपयांचा डी पी सी चा खर्च  ३१ मार्च पर्यंत न झाल्यास तो निधी परत न मागवता जिल्हा परिषद व नगरपालिकांना  देण्यास नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यास सांगितले आहे. तर  घोड आणि कुकडी प्रकल्पाला पाण्याची कमतरता भासत असल्याने व माणिकडोह धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने बोगदयाची मागणी मी जलसंपदामंत्री असल्यापासून होत आहे याबाबतचा प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलून अर्थ व नियोजन खाते माझ्याकडेच असल्याने तोही प्रश्न निकालात काढू.

               आजच्या तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता उद्योगधंदे व्यवसाय करावेत. कोरोना लस सर्वांना टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. तरी नागरिकांनी मास्क, सामाजिक अंतर पाळून कोरोनाला घरापासून ते राज्यातून हद्दपार करा असे आवाहन अजितदादा यांनी केले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार,नगराध्यक्षा शुभांगी पोटे, गटनेते मनोहर पोटे, केशवराव मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका काँग्रेस अध्यक्ष दीपक पाटील भोसले ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब दूतारे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.:  नगर जिल्ह्यात ना. बाळासाहेब थोरात, ना. शंकरराव गडाख व ना. प्राजक्त तनपुरे हे तीन मंत्री असून जिल्ह्यात आमदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, आ. आशुतोष काळे, आ. किरण लहामटे यांच्यासारखे नवीन चेहरे असून पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सर्व मिळून जिल्ह्यात विविध योजना राबवून उत्कृष्ट काम करत आहेत.असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post