आगडगावचा आमटीभाकरीचा महाप्रसाद पुन्हा सुरू

 आगडगावचा आमटीभाकरीचा महाप्रसाद पुन्हा सुरूनगर : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या नगर तालुक्यातील आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थानतर्फे देण्यात येणारा आमटी-भाकरीचा महाप्रसाद नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारपासून पुन्हा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये हे प्रसादालय बंद ठेवण्यात आले होते. आता भाविकांची गर्दी वाढू लागली असून आमटी-भाकरी सुरू झाल्याने नगरसह अन्य भागातील भाविकांची पावले आता दर रविवारी आगडगावकडे वळणार आहेत. येथील निसर्ग रम्य परिसरात काळ भैरवनाथाचे दर्शन घेऊन भाविक गरमागरम भाकरी व आमटीचा प्रसाद घेतात. अनेक जण या प्रसादासाठी देणगीही देतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post