आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांचा वाघाचे ह्रदय असलेला खरा नातू, चक्क भाजप नेत्याने केलं कौतुक

 आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांचा वाघाचे ह्रदय असलेला खरा नातू, भाजप नेत्याने केलं कौतुकमुंबई: औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक सूतोवाच केल्या नंतर  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नामांतर करून दाखवल्यास त्यांचं पहिलं अभिनंदन मी करेन, असं सांगतानाच आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य यांचं भरभरून कौतुक केलं. आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल. संभाजी महाराज देवासोबत जिथे कुठे बसले असतील तिथून त्यांना आशीर्वाद देतील. विधानसभेत भाजपतर्फे आदित्य यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव मांडणारा आमदार मी असेन, असं सुधीर मुनंगटीवार यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post