लाच प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक व खाजगी इसम 'एसीबी'च्या जाळ्यात

लाच प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक व खाजगी इसम 'एसीबी'च्या जाळ्यातनगर : तक्रारदार यांच्या भावास जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करून पोलीस कास्टडी रिमांड घेतली आहे. गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे भावास 169 प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून 1 लाख रुपयांची लाचेची मागणी करून ३० हजारांची लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षक व एका खासगी इसमाला एसीबीने ताब्यात घेतले आहे. सज्जन किसन नाऱ्हेडा,( वय 36 वर्षे, पोलीस उप निरीक्षक, जामखेड पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर, वर्ग 2, रा.मोरे वस्ती, थोरवे यांचे घरात भाड्याने, जामखेड, मूळ रा.निहालसिंग वाडी, ता.अंबड, जि. जालना) आणि तुकाराम रामराव ढोले, (वय 38 वर्ष, रा.मोरे वस्ती, जामखेड, जि. अहमदनगर, खाजगी इसम) असं आरोपींची नावे आहेत.

.यातील .तक्रारदार यांचे तक्रारी प्रमाणे दि.5/1/2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी लोकसेवक क्रमांक 1 यांनी आरोपी क्रमांक 2 यांचे उपस्थितीत तक्रारदार यांचेकडे 50000/- रु लाचेची मागणी केली. पंचा समक्ष करून तडजोडी अंती 30000/- रु लाचेची मागणी करून ती आरोपी क्र.2 यांचेकडे हॉटेल कृष्णा येथे देण्यास सांगितली. त्याप्रमाणे दि.5/1/2021 रोजी आयोजित लाचेच्या सापळा दरम्यान 30000/- रु लाचेची रक्कम आरोपी क्र. 2 यांनी आरोपी लोकसेवक क्र. 1 यांचे साठी हॉटेल कृष्णा जामखेड समोर पंचा समक्ष स्विकारली असता आरोपी क्र.2 याना रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपी लोकसेवक नं 1 यांना सुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. नगर एसीबीचे पोलिस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

▶ **मार्गदर्शक* -*1)मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

2)मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

3) मा. दिनकर पिंगळे, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* -  मा. पोलीस महासंचालक, म.रा.मुंबई.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post