महाराष्ट्रावर बर्ड फ्ल्युचे संकट, सहा जिल्ह्यात अलर्ट, 80 हजार कोंबड्या मारणार
नागपूर: देशातील काही राज्यात थैमान घालणारा बर्ड फ्लु महाराष्ट्रातही दाखल झाला असून परभणीसह सहा जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. परभणीत बर्ड फ्ल्युमुळे कोंबड्या मृत झाल्याचे आढळून आल्याने परभणीतील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. तसेच राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत, असं केदार यांनी सांगितलं. नागपूर, लातूर, अमरावती, परभणी, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील कोंबड्यांचे सँपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी वर्तवली.
Post a Comment