धक्कादायक...'सिरम'ला लागलेल्या आगीत ५ जणांचा बळी

 

धक्कादायक...'सिरम'ला लागलेल्या आगीत ५ जणांचा बळीमुंबईः पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या मांजरा येथिल    इमारतीला भीषण आग लागलेली असून, इमारतीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल. 

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी  पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय. कोव्हिशील्ड लसीची बिल्डिंग आगीच्या स्थळापासून लांब आहे, त्यामुळे कोव्हिशिल्डच्या लसीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे. फायर ऑडिट करण्यात येणार आहे. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याचं अजित पवार आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनीही या सर्व प्रकाराची माहिती घेऊन गंभीर दखल घेतलेली आहे.

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली आणि तिथे इन्सुलिनचं भरपूर मटेरियल होतं. ज्याला ज्वलनशीलता असते. त्यामुळे ती आग वाढत गेली. आग विझवण्यासाठी दोन ते तीन तास लागलेत. आता पूर्णतः आग विझलेली आहे. सगळं आता नियंत्रणात आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post