ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान, ‘ही’52 गावं संवदेनशील म्हणून जाहीर

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान, ‘ही’52 गावं संवदेनशील म्हणून जाहीरनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराची आज सायंकाळी सांगता होत असून दि.15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिंया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात 52 गावे संवेदनशील जाहीर करण्यात आली असून याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. जिल्ह्यातील 767 पैकी 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 705 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. संवेदनशील जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये नगर तालुक्यातील दरेवाडी, बुर्‍हाणनगर, निंबळक, पारनेर तालुक्यातील निघोज, शिरापूर, जवळा, कर्जुले हर्या, टाकळी ढोकेश्वर, वासुंदा, देसोडे, रेनवाडी, कान्हुर पठार, मांडवे खुर्द, पिंपळगाव रोठा, गांझी भोयरे, पठारवाडी, आळकुटी, रांजणगाव मशीद, रुई छत्रपती, आस्तगाव, सुपा, कर्जत तालुक्यातील कुंभळी, श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव, वडाळी, वडघूळ, आढळगाव, राजापूर, येवती, येळपणे, हिंगणी दुमाला, जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा, बांधखडक, दिघोळ, खर्डा, आरणगाव, घोडेगाव, शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, पाथर्डी तालुक्यातील अकोला, मोहज देवढे, माणिकदौंडी, एकनाथवाडी, चिंचपूर इजदे, येळी, जांभळी, आडगाव, कासार पिंपळगाव, खरवंडी, जोड मोहोज, चितळी, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द, हनुमंतगाव आणि कोपरगाव तालुक्यातील रवंदा या गावांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post