डॉ.निलेश शेळकेच्या पोलिस कोठडीत 5 दिवसांची वाढ

 डॉ.निलेश शेळकेच्या पोलिस कोठडीत 5 दिवसांची वाढनगर : शहर सहकारी बँकेकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बँकांची व सहकार्‍यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या डॉ.निलेश शेळके याच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. याआधी 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी दिली होती. त्याची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी डॉ. नीलेश शेळके याला पुण्यातून अटक केली होती. शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी शेळके याच्या विरुध्द सप्टेंबर 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. एकूण 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post