आ.रोहित पवारांना द्यावा लागणार 3 कोटींचा निधी, 10 ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध

 


आ.रोहित पवारांना द्यावा लागणार 3 कोटींचा निधी, 10 ग्रामपंचायती झाल्या बिनविरोधजामखेड : आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आवाहनाला जामखेड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींनी प्रतिसाद देत बिनविरोध निवडणुक केली आहे. तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींपैकी दहा गावे आता त्यांच्या बक्षिसास पात्र ठरले आहेत. आता प्रत्येकी 30 लाखांप्रमाणे जवळपास तीन कोटींचा निधी आ.पवारांना तयार ठेवावा लागणार आहे. तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, पोतेवाडी या ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या होत्या, तर राजेवाडी, सोनेगाव, सातेफळ, धोंडपारगाव या पाच ग्रामपंचायती आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या. त्यामुळे तालुक्यातील एकूण दहा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली.  तालुक्यातील बिनविरोध निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतीला 30 लाखांचा निधी मिळवून देऊ, असे आमदार रोहित पवार यांनी मागील आठवड्यात जाहीर केले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींमधून 417 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यापैकी 116 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ 301 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post