राहाता तालुक्यात विखे पाटीलच किंगमेकर, 25 पैकी 24 ग्रामपंचायती ताब्यात
नगर : भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राहता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती वर्चस्व कायम ठेवलं आहे. त्यांचं गाव असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीची सत्ता त्यांना गमवावी लागली आहे. आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांनी राहता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चांगला जोर लावला होता. अचूक नियोजनाच्या बळावर त्यांना राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश आलं. तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती जिंकण्यात विखेंना यश आलं आहे. विखे गटांचा या पंचायतींवर दणदणीत विजय झाला आहे.
Post a Comment