अल्पयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार, आरोपीला 13 वर्षांची शिक्षा

 

अल्पयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार, आरोपीला 13 वर्षांची शिक्षानगर : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून लैंगिक अत्याचार करणार्‍या विवाहित आरोपीला 13 वर्षांची सक्तमजूरी व दंडाची शिक्षा नेवासा न्यायालयाचे उपजिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एम तापकीरे यांनी सुनावली आहे. तालुक्यातील एका गावातील आरोपी मुक्तार रजाक शेख याने दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीला ती सकाळी शाळेत जात असताना प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने कारमध्ये बसून पळवून नेले होते. त्यानंतर आरोपीने सदर अल्पवयीन मुलीला पैठण, जालना, पुणे, रायपूर, छत्तीसगड, लोणार, कृष्णापुरी, तांडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी सोनई पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. सुमारे एक महिन्यानंतर पोलीस तपास घेत असताना त्यांना सदरचे जोडपे रायपूर येथे एका ट्रकमध्ये मिळून आले. आरोपीवर सोनई पोलीस स्टेशनला बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. सदरच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोषी धरले व सदरच्या घटनांमध्ये पीडित शाळकरी मुलगी असून आरोपी विवाहित आहे, अशा घटनांचा समाज मनावर विपरीत परिणाम होतो, असे स्पष्ट करीत या  आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता व्यक्त केली. आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तसेच पळवून नेल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास एक महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यामध्ये सरकारतर्फे सरकारी वकील देवा काळे यांनी काम पाहिले. पोलीस कर्मचारी अनिल जाधव, गणेश चव्हाण, गणेश आडागळे, सुभाष हजारे, ज्योती नवगिरे व मोहन शिंदे यांनी याकामी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post