न विकलेल्या तिकिटामुळे लॉटरी विक्रेता झालेला मालामाल, लागली 12 कोटींची लॉटरी

 न विकलेल्या तिकिटामुळे लॉटरी विक्रेता झालेला मालामाल, लागली 12 कोटींची लॉटरीकोल्लम: केरळमधल्या कोल्लम तालुक्यात लॉटरीची तिकिटं विकणारे शराफुद्दीन यांना त्यांच्याकडील न विकलं गेलेलं लॉटरीचं तिकिट मालामाल करून गेलय.  तिकिटं विकत असताना शराफुद्दीन यांच्याकडे असलेली जवळपास सर्व तिकिटं विकली गेली. त्यांच्याकडे केवळ एकच तिकिट राहिलं होतं. मात्र तेच तिकीट शराफुद्दीन यांच्यासाठी लकी ठरलं. त्यांना तब्बल 12 कोटींची लॉटरी लागली.45  वर्षांचे शराफुद्दीन कोल्लममध्ये लॉटरीची तिकिटं विकतात. विक्री न झालेल्या तिकिटामुळे 12 कोटी रुपये जिंकलेल्या शराफुद्दीन आता या पैशातून घर बांधणार आहेत. याशिवाय डोक्यावर असलेलं कर्ज फेडून एक लहानसा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post