चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी

 चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी

 


मुंबई : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने  चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेसह सुरू होतील. कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली होती. याचा फटका चित्रपटांना बसताना दिसत होता. यामुळे अनेकांना आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली असली तरी देखील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्यासाठी बऱ्याच नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. याचे पालन चित्रपटगृह व्यवस्थापनाला करावे लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post