अवैध दारु विक्रीविरोधात 'एक्साईज'ची धडक कारवाई, 1 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त

 अवैध दारु विक्रीविरोधात एक्साईजची धडक कारवाई, 1 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्तनगर : जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत, एक लाख नऊ हजार ५२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी नऊ हॉटेल चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असते. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्याने, अवैध दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकांची६ धांदल उडाली. विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक डी.आर. ठोकळ, दुय्यम निरीक्षक एम.एस. धोका, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत नान्नज व जवळा परिसरात हॉटेल व इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी नऊ जणांकडून देशी-विदेशी, गावठी दारू, रसायन जप्त करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post