जि.प.,पं.स.सभा आता पूर्वीप्रमाणेच सभागृहात घेण्यास परवानगी
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदांच्या सर्वच सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने यापुढील सभा पूर्वीप्रमाणेच सभागृहात घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागानं तसं पत्र दि.15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदांना पाठवलं आहे. सात ते आठ महिने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभा, स्थायी सभा किंवा इतर विषयांच्या सभा ऑनलाइन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केल्या. मात्र, आता लॉकडाऊनच्या काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत झाले आहे. तसेच अनेक दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्स सभांना, बैठकांना अडचणी येत होत्या. या सर्व बाबी लक्षात घेता शासनाने आता यापुढील सभा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणेच सभागृहात घेण्याची परवानगी दिली आहे.
Post a Comment