*जागतिक अपंग दिनानिमित्त 3 दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन*
*जिल्हा अपंग संघटनेचा उपक्रम*
*अहमदनगर पतिनिधी*:- जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .जागतिक अपंग दिन साजरा करण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेने सर्व विभागांतील दिव्यांगांना 5 दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली होती.*
*कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या शारीरिक क्षमतेचा व प्रतिकार क्षमतेचा विचार करून यावर्षी संघटनेने दिव्यांग बांधवांचा जाहीर कार्यक्रम न घेता ऑनलाईन चर्चा सत्र ,उद्धबोधनवर्गाचे आयोजन केले होते*
*दिनांक 3 डिसेंम्बर रोजी संघटनेचे राज्य सहकोषाध्यक्ष संतोष सरवदे यांनी दिव्यांगांचे शिक्षण व प्रशिक्षण या विषयावर तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिव्यांगांसाठी सरकारच्या योजना व सवलती या विषयावर मार्गदर्शन केले. दिनांक 4 डिसेंम्बर रोजी संघटनेचे राज्य संचालक उद्धव थोरात यांचे गुड गव्हर्नन्स साठी तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयावर , जिल्हा परिषद मुख्यालयातील कनिष्ठ सहाय्यक महेश भागवत यांनी अंधांच्या शिक्षणात शिक्षक पालक व समाजाचा सहभाग या विषयावर तर मुख्याध्यापक तुकाराम भगत यांनी दिव्यांगांसाठी आत्मविश्वासाची गुरुकिल्ली या विषयावर अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले .दिनांक 5 रोजी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या अडीअडचणी समजावून घेण्यात आल्या .सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचार्यांप्रमाणे राज्यातील दिव्यांगांना वाहन भत्ता मिळावा यासाठी राज्यसंघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव घेण्यात आला. वेबिनारच्या आयोजनात जामखेड येथील मुख्याध्याक बळीराम जाधव ,तसेच निंबळक शाळेचे मुख्याध्यापक पोपट धामणे यांनी परिश्रम घेतले*
*यावेळी सर्वश्री रमेश शिंदे सुखदेव ढवळे,*
*राजू आव्हाड ,दत्तात्रय जपे, खंडू बाचकर, सखाराम मेसे सर , विठ्ठल बांडे , संजय हरकळ , राजू ठुबे , गव्हाणेसर , बंशी गुंड , गंगाधर नष्टे, योगेश भागवत, साहेबराव मले, श्रीकांत दळवी, गजानन मुंडलिक, अमोल चेन्ने ,किरण माने यांसह जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला*
Post a Comment