‘तेव्हा’संपूर्ण कुटुंबाचच राजकीय भविष्य पणाला लागले होतं...

 ‘तेव्हा’संपूर्ण कुटुंबाचच राजकीय भविष्य पणाला लागले होतं...

खा.डॉ.सुजय विखे यांचा ‘चला हवा येऊ द्या’मध्ये मुक्तसंवादमुंबई : भाजप खासदार सुजय विखे पाटील 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी ऐनवेळी भाजपचे तिकिट मिळवत नगर दक्षिणेतून उमेदवारी केली होती. त्यावेळी त्यांचे वडील आ.राधाकृष्ण विखे पाटील हे कॉंग्रेसमध्ये होते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. तर त्यांच्या आई शालिनीताई विखे या जिल्हा परिषदेच्या कॉंग्रेसकडून अध्यक्षा होत्या. असे असताना सुजच विखे यांनी भाजपमध्ये जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाबाबत व त्यावेळच्या मनस्थितीबाबत खा.विखे यांनी झी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमात मुक्तसंवाद साधला. त्यावेळी मी आमच्या संपूर्ण कुटुंबाचेच राजकीय भविष्य पणाला लावले होते, अशी परिस्थिती होती. पराभूत झालो असतो तर खूपच अवघड झालं असतं पण मी विजयी झालो आणि पुढचे गणित मोकळे झाले अशा भावना विखे यांनी बोलून दाखवल्या. यावेळी मंचावर भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच आ.रोहित पवार हेही उपस्थित होते.

विखे म्हणाले की, पक्ष शेवटच्या क्षणाला बदलला तेव्हा माझे वडील विरोधी पक्षनेते होते. त्यांचंही राजकीय भविष्य मी पणाला लावलं. माझी आई जिल्हा परिषद सदस्य होती. त्याही वेगळ्या पक्षाच्या होत्या. आता मी निवडून आलो हा भाग वेगळा आहे. माझा पराभव जर झाला असता, तर कदाचित वेगळं चित्र असतं. राजकारणात लोक परत संधी देत नाहीत. एकदा एखादं राजकीय कुटुंब संपायला लागलं तर ते संपतं. माझा पराभव हे माझ्या कुटुंबाला घेऊन संपला असता, असं सुजय विखे पाटील म्हणाले. मला प्रचारातही कोणतीच भीती वाटली नाही. मात्र, मतमोजणीच्या दिवशी आई-वडिलांच्या चेहर्‍यावरचे हावभाव बघितले तेव्हा मला वाटलं, मी फार मोठी गोष्ट पणाला लावली आहे. मला त्या क्षणाला जाणीव झाली. सुदैवाने चांगलं घडलं, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post