करोना लस घेणारे आरोग्य मंत्रीच झाले करोनाबाधित

आरोग्य मंत्री अनिल विज यांना करोनाची बाधाचंदीगड: कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक बनलेले हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनिल विज यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असून उपचारांसाठी अंबाला कँटमधील सरकारी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अनिल विज यांनी सांगितलं. 

 20 नोव्हेंबर रोजी यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी पहिला डोस घेतला होता. 67 वर्षीय अनिल विज यांनी स्वत:च कोरोना लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. 20 नोव्हेंबर रोजी हरियाणामध्ये कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली होती. यावेळी अनिल विज यांनी पहिला डोस देण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post