अवैध हातभट्टी उद्योगावर 'एक्साईज'ची वक्रदृष्टी, एकाच दिवशी ७ गुन्हे दाखल, सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त.. Video

अवैध हातभट्टी उद्योगावर 'एक्साईज'ची वक्रदृष्टी, एकाच दिवशी ७ गुन्हे दाखल, सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्तनगर :  देवळाली प्रवरा परिसर, नांदुर शिवार, वाकडी शिवार, (ता.राहाता) येथील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई केली आहे.

 प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर, एस.एस.सराफ, प्र.उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर तथा निरीक्षक, अ-विभाग,ए.बी.बनकर, निरीक्षक, एस.के.कोल्हे, निरीक्षक,.बी.बी.हुलगे, आर.डी.वाजे, पी.बी. आहिरराव यांच्या पथकाने सोमवारी सकाळी देवळाली प्रवरा परीसर, (ता.राहुरी,), नांदुर शिवार , वाकडी शिवार,(ता.राहाता )या ठिकाणी दारुबंदी गुन्हयाचा छापा मारुन एकुण ७ गुन्हयांची नोंद केली आहे. सदर ठिकाणी गावठी दारु १७५ लि., रसायन १५२५० लि. व दोन दुचाकी वाहने तसेच इतर साहित्य मिळून एकुण अंदाजे किंमत ४,९२,४००/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग,अहमदनगर यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. सदर निर्मिती केंद्रावर संयुक्त मोहिमेअंतर्गत सातत्याने कारवाया करण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने, नियोजन केले आहे.

सदरच्या संयुक्त मोहिमेमध्ये जिल्ह्याच्या सहा विभागातील ४६ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

Edited by- सचिन कलमदाणे

Video by-विक्रम बनकर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post