हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा, महिलांसह ९ जणांवर गुन्हा, ४ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त... video

 थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर एक्साईजची मोठी कारवाई, हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा, महिलांसह ९ जणांवर गुन्हा, ४ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त



नगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर विभागाने आज श्रीरामपूर जवळ गोंधवणी परिसरात मोठी कारवाई केली. येथील छाप्यात सदर ठिकाणी स्पिरीट ८० ली., गावठी दारु ५६३ ली., रसायन १२२३० ली., काळा गुळ ३०० किलो,नवसागर १५० किलो, रसायन व भटटी बॅरल ७२, प्लास्टीक कॅन ३३ व दोन दुचाकी वाहने तसेच इतरसाहित्य मिळुन एकुण ४ लाख ८७ हजार रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी  प्रभाकर किसन गायकवाड, माणिक सोमाजी शिंदे, कचरू गायकवाड (फरार) (सर्व राहणार गोंधवणी, श्रीरामपूर) तसेच उषा प्रभाकर काळे, चंद्रकांत शाम पवार,( रा. कदमवस्ती, श्रीरामपूर,) साधना मोहन काळे, वंदना संतोष काळे, (रा. सूतगिरणी परिसर, श्रीरामपूर), इंदुबाई विष्णू जाधव, मीना लाला माने, (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर, जि. अहमदनगर )असे एकुण ०९ जणांवर गुन्हयांची नोंद केली आहे.

श्री.प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त,राज्य उत्पादन शुल्क,पुणे विभाग, पुणे तसेच मा.श्री.गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.एस.एम.सराफ,प्र.उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर तथा निरीक्षक, अ विभाग, अहमदनगर, सहश्री.ए.बी.बनकर, निरीक्षक, ब- विभाग, अहमदनगर, श्री.एस.के.कोल्हे, निरीक्षक, कोपरगाव विभाग, श्री.बी.बी. हुलगे, निरीक्षक, श्रीरामपुर विभाग, श्री. आर.डी. वाजे, निरीक्षक, संगमनेर विभाग, श्री.पी.बी.आहिरराव, प्रभारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भ.प. क्र.२, श्रीरामपुर, ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर यांच्या टिमने ही कारवाई केली. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरच्या संयुक्त मोहिमेमध्ये जिल्ह्याच्या सहा विभागातील ३५ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

Edited by- सचिन कलमदाणे

Video by-विक्रम बनकर






0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post