सनी लिओनी चक्क मराठमोळ्या वेशभूषेत.. ‘या’ सिनेमात झळकणार

 सनी लिओनी चक्क मराठमोळ्या वेशभूषेत.. ‘या’ सिनेमात झळकणारमुंबई : रमेश थेटे दिग्दर्शित करीत असलेल्या भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात अभिनेत्री सनी लिओनी भूमिका साकारणार असून चित्रपट निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केला आहे. द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. नृत्यांगनेच्या रुपात वावरणार्‍या हेर म्हणजे गनिमाच्या भूमिकेत सनी लिओनी दिसणार आहे. 1795 ते 1818 या कालावधीत द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव या सिनेमाचे कथानक घडते. प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल महार योद्ध्याची भूमिका साकारणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post