पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

 पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे  निधन 


 

कोल्हापूर - देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय 86) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीपती खंचनाळे यांनी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  प्रकृती बिघडल्याने श्रीपती खंचनाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून  रुग्णालयात उपचार सुरू होते.  अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

श्रीपती खंचनाळे यांचा जन्म १० डिसेंबर १९३४ रोजी शेतकरी कुटुंबात झाला होता. १९५९ मध्ये झालेल्या पहिल्या हिंद केसरी स्पर्धेत बनता सिंग यांना पराभूत करत श्रीपती खंचनाळे हे देशातील पहिले हिंद केसरी ठरले होते. त्याचवर्षी आनंद शिरसागर यांना पराभूत करत त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धाही जिंकली होती. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post