केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा शिर्डी मतदारसंघाचे वेध..

 


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा शिर्डी मतदारसंघाचे वेध..नगर : दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीत असताना रिपाइं नेते रामदास आठवले यांचा नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता. हा पराभव आठवले यांच्या मनात कायम असून आता त्यांना पुन्हा एकदा शिर्डीतून लढण्याचे वेध लागले आहेत. शिर्डीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील खासदार झाले. पण, पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून पुन्हा येईन, पुन्हा येईन आणि लवकर परत जाणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  दिली आहे.

आठवले म्हणाले, माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगर दक्षिण लोकसभेची जागा सोडली असती, तर उत्तरेत माझा पराभव झाला नसता. चार-पाच लाखांच्या मताधिक्यांनी मी विजयी झालो असतो. त्यांच्यासाठी जागा सोडली नाही आणि ऍट्रॉसिटीच्या मुद्द्यावर अपप्रचार झाल्याने माझा येथे पराभव झाला. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. तिकडे भाजपचे डॉ. विखे पाटील खासदार झाले. त्यामुळे मला इकडे यायला काही अडचण नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post