शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभा अध्यक्षांना साकडं

 *विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले ,यांना  स्वप्निल खाडे यांनी शेतकर्‍यांच्या वतीने दिले विविध मागण्यांचे निवेदन*अहमदनगर उस्मानाबाद बीड व सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या परिसरात व बिबट्या वाघाचे थैमान आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा नाहक बळी गेलेला आहे रात्रीची लाईट असल्यामुळे ज्वारीचे पीक भिजवण्यासाठी शेतात जावे लागते,त्या ठिकाणी साप विंचू काटे व उत्तर वाघ आणि रानडुक्कर यांचा धुमाकूळ आहे व शेतकऱ्यांना ते जखमी करत आहेत तर काही शेतकऱ्यांना स्वतः जीव गमवावा लागत आहे यावर राज्य शासनाने व राज्य वन विभागाने उपाययोजना कराव्यात,अशा अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी सर्पदंश व शेतकरी अपघात होऊन स्वतः जीव गमावला आहे एक तर शेतमालाला हमीभाव नाही त्यातून शेतकऱ्यांना उदरनिर्वाह देखील होत नाही,राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी शेतात काम करत असताना मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांना अपघात विमा योजना अंमलबजावणी करावी, शेतकरी अपघात विमा तातडीने परिवारास मिळावा,शेतकऱ्यांनी पिकविलेल्या प्रत्येक शेतमालाचा उपयोग देश जीवन जगण्यासाठी होतो आणि शेतकऱ्यांना अशा संकटांना तोंड देत आपल्या मुलाबाळांना घरातील माणसांना सोडून जावे लागते, व अपघाती जीवन जगावे लागते या सर्व गोष्टी आपण खूप अनुभवत आहोत,वर्षानुवर्षे आणि सरकार येतात आणि सरकारी जातात व नुस्त शेतकऱ्यांच्या कष्टाचे भांडण होत आहे याचा कोणी विचार करत नाही आपण शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा व त्यावर प्रक्रिया निर्णय करावा अशी आपणांकडून अपेक्षा व्यक्त करतो अशी मागणी करून नानासाहेब पटोले यांना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी यावेळी सौताडा येथील कार्यकर्ते नितीन सानप बिभीषण गीते सुनील घुगे व शेतकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post