बाजार समितीची दहा एकर जागा विकून मॉल बांधण्याचा डाव : प्रताप शेळके
नगर - नगर बाजार समितीची शेतकर्यांची हक्काची दहा एकर जमीन विकण्यासाठी तसेच जिल्हा बँकेचे संचालकपद पदरात पाडण्यासाठी विरोधकांनी गावोगावी पार्ट्या सुरु केल्या आहेत. शेतकर्यानी आहारी जाऊन बाजार समिती व जिल्हा बँकेवर त्यांना पुन्हा संधी देऊ नका. जिल्हा बँकेच्या माध्यमातून एकशे साठ कोटीचे खेळते भांडवल वाटप केल्याने एकही सोसायटी उर्जित अवस्थेत राहणार नाही. तुमच्या व्याजाचा पैशातून गटनिहाय पार्ट्या देण्याचा कार्यक्रम चालू आहे. दूध संघापाठोपाठ कोठी रोडवरील मार्केटची दहा एकर जागा विकून तेथे मॉल बांधला जाणार आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी केला. नगर तालुक्यातील पारेवाडी येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी माजी आ.शिवाजी कर्डिले यांच्यावर नाव न घेता टिका केली तसेच आरोपांच्या फैरी झाडल्या.
Post a Comment