शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी 84 जणांचे अर्ज

 शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी 84 जणांचे अर्जनगर : जागतिक तीर्थस्थळ असलेल्या नेवासा तालुक्यातील शनीशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदाची निवड प्रक्रिया होत असून यासाठी 84 ग्रामस्थांनी अर्ज केल आहेत. यात 11 महिलांचाही सहभाग आहे. नव्या वर्षापासून अकरा नवीन विश्वस्त देवस्थानचा कारभार पाहणार असून अर्ज केलेल्यांपैकी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवस्थानावर सुरुवातीपासून मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व असून अर्ज केलेल्यांपैकी बहुतेक त्यांचे समर्थक आहेत. 

राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने जून 2018 मध्ये शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून ट्रस्टचे काम शासनाच्या नियंत्रणात आणून गावातीलच विश्वस्त असण्याची घटना रद्द करून नवीन विधेयक मंजूर केले होते. विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर होऊन व त्यावर राज्यपालांची मोहोर लागूनही नवीन घटना व विधेयक प्रत्यक्षात साकार झाले नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या  2021 ते 2025 च्या पंचवार्षिक विश्वस्त निवडीचा कार्यक्रम नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी जाहीर केला. शिंगणापूर येथील मूळ रहिवासी असलेल्यांनी अर्ज करावेत, अशी नोटीस प्रसिद्ध केल्यावरून गावातून 84 अर्ज दाखल झाले आहेत. 21 ते 23 डिसेंबर दरम्यान अर्ज केलेल्यांच्या मुलाखती होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post