सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार -  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफकोल्हापूर: भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंचाची  निवड  पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असं सांगतानाच सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. डिसेंबर अखेर 14 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. आता कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post