नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोमवारी आरक्षण सोडत

 नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या

सरपंच पदासाठी सोमवारी आरक्षण सोडत            अहमदनगर दि. 11 : अहमदनगर तालुक्यातील सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम अ नुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर तालुक्यातील एकुण 105 ग्रामपंचायतीचे सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजअहमदनगर येथे दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी नगर भाग अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post