रस्ता लूट करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद
नगर : रस्तालूट करणार्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. शुभम अनिल काळे (वय-21), आनंद अनिल काळे (वय- 25 हल्ली दोघे रा. पुणतगाव ता. नेवासा, मुळ रा. गणेशनगर ता. राहाता) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. ते दोघे सख्ये भाऊ आहे. त्यांच्यासोबतचा सागर रमेश कर्डीले (रा. गेवराई ता. नेवासा) हा पसार झाला आहे. अंकुश विनायक तौर (रा. माजलगाव जि. बीड) हे त्यांच्या दुचाकीवर (क्र. एमएच- 44 एक्स- 2020) पाथर्डीवरून माजलगावकडे जात असताना पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील मोबाईल व दुचाकी असा 59 हजारांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी तौर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली की, हा गुन्हा सागर कर्डीले व त्याचे दोन साथीदार शुभम काळे व आनंद काळे यांनी मिळून केला आहे. निरीक्षक कटके यांनी त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी दत्ता गव्हाणे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सचिन आडबल, दीपक शिंदे, संदीप दरंदले, सागर ससाणे, सागर सुलाणे, रोहित येमुल, बबन बेरड यांना आरोपी अटक करण्याबाबत सुचना केल्या. पथकाने पुणतगाव परिसरात सापळा रचून आरोपी शुभम काळे व आनंद काळे या दोघांना अटक केली.
Post a Comment