सुमारे ७० हजार रिक्त जागांवर भरती, १२ व १३ डिसेंबरला ऑनलाईन रोजगार मेळावा

 

65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरणार-ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजनमुंबई, :  येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून तिथे आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 

12 आणि 13 डिसेंबर रोजी हा ऑनलाइन मेळावा असणार आहे. या मेळाव्यात साधारण 70 हजार रिक्तं पदं भरणार असल्याची माहिती  आहे. roigar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक युवक युवतींनी या वेबसाइटवर लॉगइन करून त्यामध्ये आपली माहिती भरायची आहे. 13 डिसेंबरपूर्वी ही माहिती भरणं अत्यंत आवश्यक आहे असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार व उद्योजक मार्गदर्शक केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केला आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग, व्यवसाय यांना नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा.

नोंदणी साठी लिंक 

roigar.mahaswayam.gov.in

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post