इंग्लंडमधील करोना स्टे्रनचा फटका...‘आर्ची’ अडकली लंडनमध्ये

 


इंग्लंडमधील करोना स्टे्रनचा फटका...‘आर्ची’ अडकली लंडनमध्येमुंबई : सैराट चित्रपटामुळे घराघरात लोकप्रिय झालेली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरु सध्या लंडनमध्ये अडकली आहे. छूमंतर सिनेमाच्या शूटिंगनिमित्त इंग्लंड दौर्‍यावर असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुला लॉकडाऊनचा फटका बसला. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रिंकूला लंडनमध्येच थांबून राहावे लागत आहे. रिंकूसोबत छूमंतर सिनेमाची टीमही इंग्लंडमध्येच आहे. समीर जोशी दिग्दर्शित छूमंतर सिनेमाचे चित्रिकरण इंग्लंडमध्ये सुरु आहे. यामध्ये रिंकू  राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेही तिथे शूटिंग करत आहेत. गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post