थंडीबरोबर करोनाबाधितही वाढतायत, आज ‘इतक्या’ नवीन रूग्णांची भर

 दिनांक: ०९ डिसेंबर, २०२०, रात्री ७ वा


आतापर्यंत ६३ हजार ०८१ रुग्ण बरे होऊन परतले घरी


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के


आज ३४५ रुग्णांना डिस्चार्ज तर ३१६ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर: जिल्ह्यात आज ३४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३१६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५५७ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११० आणि अँटीजेन चाचणीत १०९ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले ०२,  जामखेड ०४, कोपरगाव २५,  नगर ग्रामीण ०५, नेवासा ०६, पारनेर ०२, पाथर्डी १०,  राहुरी ०२, संगमनेर ०५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, कॅन्टोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९, अकोले ०२, कर्जत ०२, कोपर गाव ०२, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०४, पारनेर ०७, पाथर्डी ०२, राहाता ११,  राहुरी ०६,  संगमनेर १७,  शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर  ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १०९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, अकोले ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०६,  नेवासा ०५, पारनेर ०५, पाथर्डी १४, राहाता १२, राहुरी ०२, संगमनेर २१, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०८  अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ९८, अकोले १६, जामखेड ०५, कर्जत १३, कोपरगाव १४, नगर ग्रामीण १७, नेवासा २१,  पारनेर २०, पाथर्डी १६, राहाता १७, राहुरी १३, संगमनेर ६०, शेवगाव १६, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर १० अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:६३०८१


उपचार सुरू असलेले रूग्ण: १५५७


मृत्यू:९७१


एकूण रूग्ण संख्या:६५६०९


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


माझेकुटुंब_माझीजबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post