दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचे निधन

 

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचे निधननगर : टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं होतं. त्या धक्क्यातून कुटुंब आणखी सावरलेही नव्हते तोच रायकर कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. पांडुरंग रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचे कोरोनाने निधन झालं आहे.


अहमदनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचं शरीर उपचाराला साथ देत नव्हते. अखेर उपचारादरम्यान आज सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

लक्ष्मण रायकर श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी सून आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post