बदनामी करणार्‍या ‘त्या’ समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी

  बदनामी करणार्‍या ‘त्या’ समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी

 शीख, पंजाबी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदननगर- दिल्ली येथे मागील 32 दिवसापासून कडाक्याच्या थंडीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने सोडवावा, तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावरुन समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी हरजीतसिंग वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, राजू मदान, चमनलाल कुमार, पुनीत भूतानी, राजा नारंग, रामसिंग कथुरिया, किरपाल सिंग, अमरजितसिंग वधवा, हरजिंदर सिंग, सुरेंद्रसिंग चावला, जस्मीत वधवा, सनी वधवा, अजितसिंग वधवा, संदीप आहुजा, ए.सी. कंत्रोड, हरविंदरसिंग नारंग, सरबजितसिंग अरोरा, बलजितसिंग बिलरा, हरवीरसिंग मक्कर, बॉबी सिंग आदि उपस्थित होते.

 तसेच या आंदोलनामुळे समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. खलिस्तानवादीचा मुद्दा उपस्थित करुन आंदोलक शेतकर्‍यांना खलिस्तानवादीची उपमा दिली जात आहे. शेतकरी आंदोलनातील सर्व शीख, पंजाबी बांधव हे भारतीय असून, त्यांचे अनेक सपुत्र भारतीय सेनेत देशसेवा करीत आहे. तर लंगर सेवेच्या माध्यमातून संकटकाळात संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी योगदान दिले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शेतकरी आंदोलनाचा प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने सोडवावा, तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावरुन समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शीख, पंजाबी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post