राजकीय वैर असलं तर घरात संवाद असावा

 

राजकीय वैर असलं तर घरात संवाद असावा

धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांना भावनिक सादपरळी :  'लोकांच्या प्रश्नांसाठी लढा उभा करणं दिवंगत मुंडे साहेबांकडून शिकायला मिळालं, तर प्रश्न सोडवणं पवारसाहेबांकडून शिकलो. माझ्या सारखा नशीबवान मीच,' अशा भावना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. ते आज गोपीनाथ गडावर जयंती निमित्त दर्शन घेतल्यानंतर बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना मुंडे कुटुंबाच्या नात्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'आज साहेबांची जयंती म्हटलं की मनाला वेदना होतात. अप्पांचा वाढदिवस मी परळीत मोठ्या थाटा माटात साजरा करायचो. अण्णांच्या जाण्यानंतर मुंडे कुटुंबात या पीढीतला मी सर्वात मोठा आहे. घर मध्ये जरी राजकीय वैर असलं तर घरात संवाद असावा ही माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे. तसं होत असेल तर आमची काहीच अडचण नाही. शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि घर घराच्या ठिकाणी असावं, अस मानणारा मी आहे.'

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post