‘त्या’वेळी शरद पवार पंतप्रधान झाले असते, पण....

 ‘त्या’वेळी शरद पवार पंतप्रधान झाले असते, पण....

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावामुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1996 ला देशात कॉंग्रेसचे सरकार आले असते पण नरसिंह राव यांच्यामुळे देवेगौडा सरकार सत्तेत आलं. पवारांनी कॉंग्रेसला दिलेली ताकद पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते, पण दिल्लीच्या दरबारी राजकारणामुळे त्यांची ही संधी हुकली, असा दावा पवार यांचे निकटचे सहकारी तथा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पटेल यांनी एका इंग्रजी दैनिकांसह अनेक वर्तमानपत्रात लेख लिहिले आहेत. यात त्यांनी पवारांच्या पंतप्रधानपदाबाबत जवळून अनुभवलेलं भाष्य केलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी लेखात म्हटलं आहे की, कॉंग्रेसची काम करण्याची पद्धत आपल्या पक्षात स्वतःच क्षेत्रीय नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे अशी आहे. जे पवारांसोबतही केले गेले. राजीव गांधींच्या हत्येनंतर फक्त पवारांना दूर ठेवणे या एका अजेंड्यासाठीच नरसिंह राव यांना आणले गेले. देशभर कॉंग्रेसला पवार हवे होते. 1996 मध्ये पवार पंतप्रधान असणारी कॉंग्रेस सरकार बनू शकत असतानाही फक्त नरसिंह रावांमुळे देवेगौडा सरकार बनली. माझ्या घरातून ह्या घडामोडी होत होत्या, मी अधिकाराने हे सांगू शकतो, असा दावा देखील प्रफुल पटेलांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post