कोरोना काळात राज्यात मोठा भ्रष्टाचार, चौकशी झाली पाहिजे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका
राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, महादेव जानकर, विनायक मेटे, अविनाश महातेकरजी आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे:
- या सरकारला चर्चाच होऊ द्यायची नाही. त्यामुळे केवळ 2 दिवसांचे अधिवेशन. आज शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. अनेक ठिकाणी कवडीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
- कोरोनाच्या संपूर्ण काळाचा पंचनामा करण्याची गरज आहे. या काळातही भ्रष्टाचार हा संताप आणणारा. 48 हजार मृत्यू राज्यात झाले आहेत. सरकार स्वतः स्थिती हाताळणीचा दावा का करते, हे अनाकलनीय आहे.
- महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. शक्ती कायद्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित.
- मराठा आरक्षणावर सरकार अपयशी. सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळणे हे दुर्दैवी. आज ओबीसी आरक्षण संदर्भात मंत्रीच प्रश्न उपस्थित करीत आहेत.
- समाजामध्ये भयाचे वातावरण. ते तत्काळ दूर करणे गरजेचे.
राज्यातील सामाजिक घडी विस्कटता कामा नये. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबाबत सरकारने निःसंदिग्ध ग्वाही देणे गरजेचे.
- मुंबईचे प्रकल्प सरकारने वाऱ्यावर सोडले. राज्यात अघोषित आणिबाणी या सरकारने लावली आहे. सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सत्ता डोक्यात गेली की असे होते.
संसदेत कृषि विधेयकावर चर्चा झाली नाही असे आरोप करतात. पण ते खरे नाही. जेव्हा चर्चेचा आग्रह धरला गेला, तेव्हा गोंधळ घातला गेला.
- मुख्यमंत्र्यांनी जेथे भेटी दिल्या, त्या सर्व आमच्या काळात सुरू झालेल्या योजना.
- भाजपाला हे सरकार पाडण्यात रस नाही. ते स्वतःच्या अंतर्विरोधानेच पडेल.
- जेथे जेथे समाजाचे दुःख आणि दैना दिसेल, तेथे आंदोलन करूच. त्यांनी खुशाल तक्रारी कराव्या.
- कोरोनाच्या काळात भ्रष्टाचार ज्यांनी कुणी केला असेल, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे.
Post a Comment