ग्रा.पं.निवडणुकीसाठी जातपडताळणी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईनही स्विकारण्याचे आदेश
मुंबई : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे 29 आणि 30 डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत असे निर्देश बार्टीतर्फे जात पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचार्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत असे आदेश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत, असे मुंडे यांनी नमूद केले आहे.
Post a Comment