मोठी बातमी...ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारणार

मोठी बातमी...ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारणार

30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदतनगर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आली असली तरी अनेक भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची अडचण येत असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य निवडणुक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत ऑफलाईन पदध्तीनेही उमेदवारी अर्ज स्विकारण्यास मंजुरी दिली आहे. इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहू नये यासाठी आयोगाने पारंपरिक पध्दतीने म्हणजेच ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ दि.30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ऑफलाईन अर्ज स्विकारल्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी संगणक प्रणालीत अपलोड करून घेण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post