पंचायत समितीच्या नूतन इमारतीत छत्रपतींचा पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा

 पंचायत समितीच्या नूतन इमारतीत छत्रपतींचा पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळापाथर्डी : पाथर्डी तालुका पंचायत समितीच्या नव्या इमारतीत महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर अर्धपुतळा अनेक वर्षांपासून पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत होता. या जुन्या इमारतीतुन पंचायत समितीचा कारभार चालु असताना संपुर्ण तालुक्यातील हजारो नागरीकांना महाराजांचे दर्शन होत होते. मात्र नवीन इमारत उभी राहून चार वर्ष झाली तरी शिवरायांचा पुतळा जुन्याच इमारतीत होता. सदर पुतळा नवीन पंचायत समिती इमारतीत हलविण्याची मागणी शिवप्रेमींमधून होत होती. या मागीला आता यश आले असून जिल्हा प्रशासनाने पुतळा स्थलांतरित करण्यास मंजूरी दिली आहे.

पंचायत समितीचे नेते विष्णुपंत आकोलकर  2016 पासुनच यासाठी धडपड करत होते. एप्रिल 2018 ला अकोलकर यांनी पंचायत समितीत पुतळा स्थलांतरचा ठराव मंजूर करून घेतला. तेव्हा पासुन पंचायत समिती प्रशासन आणि  जिल्हाप्रशासन यांचा  पत्र व्यवहार चालु होता. यादरम्यान मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश ईथापे हेही उपजिल्हाधिकारी यांच्याशी वारंवार चर्चा करत होते. 30 ऑक्टोबर रोजी आमदार मोनिका राजळे, विष्णुपंत आकोलकर , पंचायत समिती सभापती गोकुळ दौंड व सर्व सहकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर हा विषय पुन्हा मांडला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी स्थलांतरास मंजुरी दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post