शाळेची घंटा कोण वाजवणार? नवीन शिपाई भरती कायमची बंद

 राज्यातील शाळांत आता नवीन शिपाई भरती नाही
मुंबई : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील  शिपाई  पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने  घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील  शिपायांच्या सुमारे ५२ हजार नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. 

सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. नवीन भरतीऐवजी शाळांना ठोक स्वरुपात शिपाई भत्ता दिला जाणार आहे. यात शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामाठी, तेलवाला, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर यांचा समावेश आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post