रेखा जरे खून प्रकरण...बोठे याच्या अटकपूर्वी जामीन अर्जावर 11 डिसेंबरला सुनावणी
नगर : यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या संस्थापिका रेखा जरे खून प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आलेल्या बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 11 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बोठे याने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया आज झाली. त्यावर आरोपीच्या वकीलांचे मत ऐकून घेण्यात आले. तसेच पोलिसांचे मत यावर मागविण्यात आले असून, यावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान बोठे याचा शोध अद्याप लागलेला नसून पोलिसांची पथके त्याला ताब्यात घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास करीत आहेत.
Post a Comment