जाधव परिवाराने नावाप्रमाणेच नंदनवन फुलविले - अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर

 जाधव परिवाराने नावाप्रमाणेच नंदनवन फुलविले - अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर     नगर - धार्मिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, शेती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जाधव परिवाराने आपल्या कौशल्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा विविध क्षेत्रात काम करतांना माणुसकी, सामाजिकता सांभाळून  या समुहात काम करणार्‍या व्यक्तींच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांना मायेचा आधार दिला आहे. एवढामोठा परिवार नंदनवन ग्रुपच्या एका छताखाली आणून नावाप्रमाणेच नंदनवन फुलविले आहे.  असे प्रतिपादन तुझं माझं जमतयं या मालिकेतील पम्मी फेम अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांनी  केले.

     अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांनी नंदनवन गु्रपच्या हॉटेल पॅरेडाईजला सदिच्छा भेट दिली असता यांच्याशी नगरसेविका सौ.सुवर्णा जाधव यांच्याशी चर्चा करुन सत्कार केला. याप्रसंगी समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, मानसी जाधव, हेमंत जाधव, राज जाधव, गगन शिंदे, विशाल गायकवाड आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post