भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसत असल्याने मी तपासणी केली आणि तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे मी पालन करीत आहे. माझी प्रकृती ठीक आहे. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत: आयसोलेट करावं व स्वत:ची चाचणी करुन घ्यावी.
Post a Comment