राष्ट्रवादी जोमात, 'यांनी' केला राष्ट्रवादीत प्रवेश

 


 आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना  बळकट : रेश्माताई आठरेअहमदनगर : अहमदनगर शहरात आ. संग्राम जगताप यांच्या कुशल व विकासाभिमुख नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन बळकट होत आहे.
त्यामुळे पक्षात प्रवेश करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगर शहर जिल्हा महीला आघाडीच्या अध्यक्षा रेशमाताई आठरे यांनी केले.

 शहरातील वर्षाताई कुऱ्हाडे , विद्याताई बोरुडे , ज्योत्स्ना बनसोडे , आशाताई चेमटे यांचा राष्ट्रवादी शहर महिला आघाडीमध्ये आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.
यावेळी आ. जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांच्या सक्षमीकरणाला नेहमीच चालना दिली आहे. राजकारणात व पक्षसंघटनेत महिलांना नेहमी संधी दिली जाते. 
त्यामुळे महिलांमध्ये नेतृत्व गुण विकसीत होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. या वेळी शहर जिल्हा अध्यक्षा रेश्मा आठरे , युवक अध्यक्ष अभिजित खोसे , सुमित कुलकर्णी, सुनंदाताई कांबळे, वर्षाताई पाटोळे , उषाताई सोनटक्के आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post